Manish Malhotra : ड्रेस आणि दिग्दर्शननंतर आता थेट ‘या’ नव्या उद्योगाला सुरूवात

Manish Malhotra : ड्रेस आणि दिग्दर्शननंतर आता थेट ‘या’ नव्या उद्योगाला सुरूवात

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा बाॅलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मनीष मल्होत्राला बाॅलिवूड क्षेत्रात तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Published by  :
shweta walge

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा बाॅलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मनीष मल्होत्राला बाॅलिवूड क्षेत्रात तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आता मनीष मल्होत्राने एक मोठी घोषणा ही केली आहे. नुकताच मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसची घोषणा केली आहे.

मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसचे नाव स्टेज 5 असे ठेवले आहे. आता याच प्रोडक्शन हाउसच्या खाली अनेक चित्रपटांची निर्मिती ही केली जाणार आहे. मनीष मल्होत्रा याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्या प्रोडक्शन हाउसच्या नावाची घोषणा करत मनीष मल्होत्रा याने म्हटले की, मुळात म्हणजे मला लहानपणापासूनच कपडे, रंग, चित्रपट यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. मला कपडे डिझाइन आणि संगीतात आवड आहे. मी भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग होण्याचा विचार केला. कपड्यांबद्दलच्या आकर्षणामुळे मला कॉस्च्युम डिझायनर बनण्याची आणि अनेक वर्षांनी स्वतःचे लेबल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com