Prema Kiran
Prema KiranTeam Lokshahi

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन झालं आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचं निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

प्रेमा किरण यांनी अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये (Movie) त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.

लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. चित्रपटातील त्यांची गाणी आजही प्रसिद्ध आहे. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com