दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या शुभहस्ते "मु. पो. देवाचं घर" चित्रपटाचा मुहूर्त

दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या शुभहस्ते "मु. पो. देवाचं घर" चित्रपटाचा मुहूर्त

दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या शुभहस्ते "मु. पो. देवाचं घर" चित्रपटाचा मुहूर्त
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

"मन कस्तुरी रे" या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्यानंतर दिग्दर्शक संकेत माने आता "मु. पो. देवाचं घर" हा नवा कोरा चित्रपट यावर्षी आपल्या भेटीस घेऊन येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त चित्रपट दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या शुभहस्ते मुंबई येथे करण्यात आला.

कीमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी मु. पो. देवाचं घर हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. महेश कुमार जायसवाल, कीर्ती जायसवाल, वैशाली संजू राठोड यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओचे प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन, चिनार - महेश यांचे संगीत तर अतुल साळवे कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहत आहेत.

चित्रपटाची कथा सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारी अशी आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, भोर येथे होणार आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून लवकरच चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच करण्यात येणार असल्याचे लेखक, दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com