“आरारारा…खतरनाक..”गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

“आरारारा…खतरनाक..”गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

Published on

मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार व प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' या गाण्याने रसिकांना प्रचंड भुरळ घातली.'शिवबा ते शिवराय' दृकश्राव्य कार्यक्रम, 'जीवन यांना कळले हो' स्टेज रियालिटी शोचे त्यांनी लेखन व दिग्दर्शन केले होते. 'लक्ष्य' या लोकप्रिय झालेल्या मालिकेचंही लेखक होते.'देऊळ बंद' या यशस्वी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक असलेले प्रणित कुलकर्णी 'सुरक्षित अंतर ठेवा' या नाटकाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या पुनर्भेटीला आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com