रक्षाबंधनला बहिण - भावावर आधारित हे चित्रपट नक्कीच पाहा

रक्षाबंधनला बहिण - भावावर आधारित हे चित्रपट नक्कीच पाहा

रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण घरबसल्या आपल्या भाऊ- बहिणींसोबत आणि फॅमिलीसोबत भाऊ- बहिणींच्या नात्यावरील खास चित्रपट पाहू शकता.
Published by  :
Team Lokshahi

रक्षाबंधन या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ आतुरतेने वाट पाहत असतो. येत्या ३० ऑगस्टला अर्थात बुधवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण घरबसल्या आपल्या भाऊ- बहिणींसोबत आणि फॅमिलीसोबत भाऊ- बहिणींच्या नात्यावरील खास चित्रपट पाहू शकता. चला तर जाणून घेऊया चित्रपटाविषयी...

'रक्षाबंधन'

अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली असून भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अक्षयची आणि ४ बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे.

'दिल धडकने दो'

झोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो'मध्ये एका श्रीमंत कुटुंबीयाची कथा दाखवण्यात आली आहे. रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रपटाची कथा चित्रित करण्यात आली आहे.

'हम साथ साथ हैं'

'हम साथ साथ है' या चित्रपटामध्ये मोहनीश बहल, सलमान खान, सैफ अली खान आणि नीलम कोठारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.

'छोटी बहन'

1959 मध्ये आलेला 'छोटी बहन' हा बहिण-भावाच्या प्रेमावरील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील 'भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना...' हे गाणे आजही खूप ऐकले जाते.

'रेशम की डोरी'

आत्मा राम दिग्दर्शित 'रेशम की डोरी' 1974 मध्ये आलेल्या चित्रपटात भाऊ-बहिणीच्या नात्याचे अतिशय चांगले चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होता.

'बंधन'

सलमान खान, जॅकी श्रॉफ आणि रंभा स्टारर 'बंधन' हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे.

'फिजा'

हृतिक रोशन आणि करिश्मा कपूरचा 2000 प्रदर्शित झालेला फिजा हा चित्रपट भाऊ-बहिणींच्या नात्यावर आधारित आहे.

'क्रोध'

चित्रपटामध्ये सुनील शेट्टीने एका भावाचे पात्र साकारले आहे. चित्रपटाची कथा सुनीलच्या ५ बहिणींभोवती फिरत आहे.

'सरबजीत'

या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसत आहे. रणदीप आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली आहे.

'इक्बाल'

इक्बाल हा नागेश कुकुनूर दिग्दर्शित आणि लिखित 2005 मधील स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात एक बहीण आपल्या भावाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com