Nagraj Manjule: नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

'बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे.
Published by  :
Team Lokshahi

नागराज मंजुळेंचा 'बापल्योक' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटातून बाप आणि लेकाचा भावनिक विषय घेऊन येणाऱ्या दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे उभे राहिले आहेत. 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटसृष्टीतील हे दोन दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

नागराज मंजुळे म्हणाले, "सरणारी वर्ष आणि वाढणार सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सफळ संपूर्ण होतो. आजवर बापलेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही. मकरंदला हा प्रवास मांडावसा वाटला. मला ती गोष्ट भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकार घेतला.

‘तिरक्या रेघेवरचं असतं बापलेकचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं, अन् घावलं तर?…तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असं मकरंद माने सांगतात.

'बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केल आहे. बाप आणि लेकाची कहाणी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com