अखेर 'त्या' व्हायरल व्हिडिओतील घटनेवर नाना पाटेकर म्हणाले...

अखेर 'त्या' व्हायरल व्हिडिओतील घटनेवर नाना पाटेकर म्हणाले...

अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतो आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतो आहे. नाना पाटेकर बनारसमध्ये शूटिंग करत आहेत. तेव्हाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला होता. नाना यांचे शूटिंग चालू असताना हा चाहता मध्येच आला आणि त्यांच्यासोबत फोटो काढू लागला. त्यावेळीच त्यांनी त्याला जोरदार टपली मारली आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर म्हणाले की, तो सीन आमच्या सरावाचा भाग होता. तो सीन परत शूट करायचा होता. तितक्यात एक मुलगा तिथे आला आणि मी त्याला टपली मारली. पण मला नंतर समजल की तो मुलगा सीनमधला नव्हता. त्यानंतर त्याला बोलवायला जाईपर्यंत तो निघून गेला. फोटो काढण्याला कधी मी कुणाला नाही म्हणत नाही. हे सगळ चुकून घडले. मला काहीच माहिती नाही तो कुठून आला. माझी चूक झाली असेल तर माफ करा. सिनेमा शुटींग दरम्यान घडलेल्या घटनेवर नाना पाटेकरांची जाहीर दीलगिरी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com