Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

"नवरा माझा नवसाचा 2" २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात
Published on

"नवरा माझा नवसाचा" ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला.

नुकतेच ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.

अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com