जॉन अब्राहमचा  ‘अटॅक’ चित्रपटाचं नवे पोस्टर प्रदर्शित

जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ चित्रपटाचं नवे पोस्टर प्रदर्शित

Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) 'अटॅक' हा चित्रपट (28 जानेवारी 2022) ला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  आता 'अटॅक' ('Attack') हा चित्रपट (1 एप्रिल 2022) ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.


'अटॅक' या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमचा अॅक्शन रुप पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट 1 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार असून 'अटॅक' या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आनंद (Raj Anand) यांनी केले.  या सिनेमात जॉन अब्राहमसह, जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुलप्रीत सिंह (Rakulpreet Singh) दिसणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com