'Fu Bai Fu' New Season
'Fu Bai Fu' New SeasonTeam Lokshahi

'फू बाई फू' चा नवाहंगाम...

'फू बाई फू' चा नवीन सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Published by :
Team Lokshahi
Published on

'फू बाई फू' चा नवीन सीझन आज ( ३ नोव्हेंबर ) रात्री ९:३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे यांनी या शो चे सूत्रसंचालन केले होते आणि आता मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी या शो चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे व सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेता उमेश कामत हे या नवीन सीझनचे जज असणार आहेत.

'Fu Bai Fu' New Season
December Bank Holiday | डिसेंबरमध्ये 12 दिवस बँका बंद…पाहा संपूर्ण यादी

2010 ते 2014 या चार वर्षांपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा लोकप्रिय कॉमेडी टीव्ही शो आता एका दशकाच्या अंतरानंतर टेलिव्हिजनवर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. फू बाई फू या कार्यक्रमाने भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सुप्रिया पाठारे या सारख्या अनेक विनोदी कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं व त्यांचासाठी एक वेगळा आणि नवीन मंच मिळवून दिला.

आत्ताच्या नवोदित विनोदी कलाकारांपैकी प्रसिद्ध असलेला ओंकार भोजने हा देखील ह्या शो चा एक भाग असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढलेली दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com