Nitin Desai : नितीन देसाई यांचं लालबागच्या राजाशी आहे 'हे' खास कनेक्शन
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल स्वत:चे जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
मुंबईच्या ‘लालबागचा राजा’चं यंदा 90 वं वर्ष आहे. या नव्वदाव्या वर्षीचं मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा नितीन देसाई यांनीच केला होता. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी लालबागच्या राजाचा विजय असो. लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला. गणपती बाप्पा मोरया असं कॅप्शन दिलं होते.
अजून काही फोटो शेअर करत त्यांनी ‘आमच्या लालबागच्या राजाचं आगमन जवळ आलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने मुहूर्त आणि पूजाअर्चना पार पडली.’असं कॅप्शन दिलं आहे. यावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी शोक व्यक्त करत म्हणाले की, 2008 - 09 पासून नितीन देसाई लालबागच्या राजाचे सजावट आणि मुख्यप्रवेशद्वाराचे काम बघतायत. ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या रविवारी नितीन देसाई लालबागच्या राजाच्या स्टेजवर आले होते. जवळपास 2 तास ते आमच्यासोबत होते. त्यांनी सगळ्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचा आवडता छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आम्ही साकारत होतो. त्यामुळे लालबागच्या राजाच्या टीमसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. कला विश्वातलं मोठं नाव आज हरवलं.