On the one hand, breast pumping for a baby, on the other hand, the photo of makeup girl Gadot is viral
मनोरंजन
एकीकडे बाळासाठी ब्रेस्ट पंपिंग तर दुसरीकडे मेकअप गल गडोटचा फोटो व्हायरल
हॉलिवूड अभिनेत्री वंडर वुमन गल गडोट (Gal Gadot) नेहमीच चर्चेत असते. गल गडोट नुकतीच तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनंतर लगेचच गल गडोट पुन्हा एकदा कामावर परतली आहे.
गल गडोटने (Gal Gadot) नुकताच सोशल मीडियावर नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती सेटवर ब्रेस्ट मिल्क पंप करताना दिसतेय. गल गडोट सेटवर बाथरोबमध्ये एका खुर्चीवर बसलेली दिसतेय. यात मेकपमन एकीकडे गल गडोटचा मेकअप करत आहेत. तर दुसरीकडे ती बाळासाठी पंपिगने दूध काढत आहे. या फोटोला गल गडोटने "बॅकस्टेजच्या मागे, एक आई म्हणून" असे कॅप्शन लिहले आहे.