Oscar Awards 2025 : 'हा' चित्रपट ठरला ऑस्कर २०२५ चा विजेता ठरला.. जाणून घ्या पूर्ण यादी

Oscar Awards 2025 : 'हा' चित्रपट ठरला ऑस्कर २०२५ चा विजेता ठरला.. जाणून घ्या पूर्ण यादी

ऑस्कर पुरस्कार 2025: 'अनोरा' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट नायिका आणि एड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेता. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी.
Published by :
Team Lokshahi
Published on

Oscar Awards 2025 Winners List : ऑस्कर पुरस्कार हा मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 03 मार्च 2025 रोजी ९७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षी, अनेक चित्रपटाची नावं ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत होती. मात्र एकाही भारतीय चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही.

'अनुजा' ऑस्करमधून बाहेर

'अनुजा' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला. कारखान्यात काम करणाऱ्या 9 वर्षाच्या मुलीची कथा या चित्रपटात मांडली आहे. गुनीत मोंगा व प्रियांका चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला ऑस्करचे नामाकंन होते परंतु चित्रपट विजेता ठरु शकला नाही.

कोणत्या चित्रपटाने मारली बाजी

'अनोरा' हा सर्वात्कृष्ट चित्रपट ठरला असून या चित्रपटाची नायिका मिकी मॅडिसनला सर्वात्कृष्ट नायिकेचा पुरस्कार पटवला आहे. तसेच अभिनेता एड्रियन ब्रॉडीने २०२५ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दुसरा अकादमी पुरस्कार जिंकला. 'द ब्रुटालिस्ट' चित्रपटातील ब्रॅडी कॉर्बेटच्या भूमिकेसाठी ब्रॉडीला हा पुरस्कार मिळाला आहे. शॉन बेकर यांना 'अनोरा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला.

ऑस्करच्या विजेत्यांची यादी

सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - किरन कल्किन

सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री : झो सलदाना- (एमिलिया पेरेज)

सर्वोत्तम मूळ पटकथा - शॉन बेकर - (अनोरा)

सर्वोत्तम रुपांतरित पटकथा - पीटर स्ट्रॉघन ( कॉन्क्लेव्ह)

सर्वोत्तम छायाचित्रण - लॉल क्रॉली (द ब्रुटलिस्ट)

सर्वोत्तम फिल्म संपादन - शॉन बेकर (अनोरा)

सर्वोत्तम उत्पादन डिझाइन - नेथन क्रॉली आणि केटी स्पेन्सर (विकेड)

सर्वोत्तम वेशभूषा डिझाइन - पॉल टाझवेल - (विकेड)

सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्म- (फ्लो)

सर्वोत्तम मेकअप आणि हेअरस्टाईलिंग- (द सबस्टन्स)

सर्वोत्तम मूळ संगीत - डॅनियल ब्लंबर्ग - (द ब्रुटलिस्ट)

सर्वोत्तम मूळ गाणे - (एआय माई) - (एमिलिया पेरेज)

सर्वोत्तम ध्वनी- (ड्यून: पार्ट टू)

सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स- (ड्यून: पार्ट टू)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com