Oscar Nominations : 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन;  भारतातील दोन माहितीपटही पुरस्काराच्या शर्यतीत

Oscar Nominations : 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन; भारतातील दोन माहितीपटही पुरस्काराच्या शर्यतीत

गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्येसुद्धा जागा बनवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्येसुद्धा जागा बनवली आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ऑस्कर 2023 साठी अंतिम नामांकने जाहीर झाली आहेत.

यामध्ये RRR या भारतीय चित्रपटातील नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला होता. तर RRR ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि नातू-नाटूने समीक्षकांच्या पसंती पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाणे जिंकले.

याचबरोबर शॉनक सेन यांची डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म All That Breathes ही यावेळीऑस्कर अवॉर्ड्स २०२३ मध्ये नॉमिनेट झाली आहे. इतकेच नाही तर दिग्दर्शक गुनीत मोंगी यांची The Elephant Whisperers डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेट झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com