Pankaj Tripathi To Play Former PM Atal Bihari Vajpayee In Biopic
Team Lokshahi
मनोरंजन
अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकमध्ये दिसणार पंकज त्रिपाठी
आपल्या राजकीय करियरमध्ये तीनदा पंतप्रधान पदावर राहीलेले अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना याची उत्सुकता लागली आहे.
आपल्या राजकीय करियरमध्ये तीनदा पंतप्रधान पदावर राहीलेले अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना याची उत्सुकता लागली आहे. अटलजींची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याची उत्सुकता लागली होती.
आता अभिनेता पंकज त्रिपाठी ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे निश्चित झाल्याने प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अटलजींवरील या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आणि उत्कर्ष नैथानी यांनी केले आहे.
भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओज द्वारे प्रस्तुत, अटल ची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी केली आहे आणि 70 मिमी टॉकीजचे जीशान अहमद आणि शिव शर्मा यांनी सह-निर्मिती केली आहे.