पंकज त्रिपाठींचा 'कडक सिंह' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरनं वेधलं लक्ष!

पंकज त्रिपाठींचा 'कडक सिंह' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरनं वेधलं लक्ष!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published by  :
Team Lokshahi

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कहानियां कईं पर सच सिर्फ एक. क्या कड़क सिंह झूठ के आगे की चीजों को देख पाएगा?' कडक सिंह चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी यांचे हावभाव गंभीर दिसत आहेत.

कडक सिंह या चित्रपटासोबतच पंकज त्रिपाठी यांच्या इतर आगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मैं अटल हूं, मेट्रो इन दिनो आणि स्त्री-2 हे पंकज त्रिपाठी यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com