शाहरुख खानला जिवंत जाळून टाकणार - संत परमहंस आचार्य

शाहरुख खानला जिवंत जाळून टाकणार - संत परमहंस आचार्य

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरुन सगळीकडे वादाची ठिणगी उठली आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरुन सगळीकडे वादाची ठिणगी उठली आहे. सगळीकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहे. पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने या वादाला सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अयोध्येमधील संत परमहंस आचार्य यांनी शाहरुख खानला जाहीर धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की, “पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. आमच्या सनातन धर्मातील लोक सतत याचा विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचं पोस्टर जाळलं आहे. आता मी त्याला शोधत आहे. जर मला तो कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकू. जर इतर कोणी जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. या चित्रपटावर बहिष्कार टाका असं मी आवाहन करतो” असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com