Laal Singh Chaddha
Laal Singh ChaddhaTeam Lokshahi

बंगालमध्ये 'लाल सिंग चड्ढा' विरोधात जनहित याचिका दाखल

याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली
Published by :

आमिर खान (Aamir Khan) यांच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या डोक्यावरून संकटाचे ढग काही हटत नाहीत. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय हे तर सर्वांनाच माहीत आहे. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलाय तर दुसरीकडे नेटफ्लिक्सनेही 'लाल सिंग चड्ढा'चे ओटीटी हक्क विकत घेण्यास नकार दिला आहे. आता बातम्या येत आहेत की आमिरच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात पश्चिम बंगालमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Laal Singh Chaddha
तुमची मुले अकाली तरुण होतायत का? त्यामुळे ही लक्षणे दिसताच काळजी घ्या

याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटामुळे काही प्रेक्षकांमध्ये अशांततेच वातावरण निर्माण झाल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होतं. यासाठी आमिरच्या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याशिवाय चित्रपटावर बंदी घालता येत नसेल तर सर्व चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करावा.

Laal Singh Chaddha
तुमची मुले अकाली तरुण होतायत का? त्यामुळे ही लक्षणे दिसताच काळजी घ्या

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाविरोधात वकील नाझिया इलाही खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीमुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर लालसिंग चड्ढा हा चित्रपट सिनेमागृहात फ्लॉप ठरला. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली. यानंतर बॉक्स ऑफिसवर लाल सिंग चड्ढा चित्रपटाची बॉक्स ऑफिसची कमाई दिवसेंदिवस कमी होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com