'मी जिवंत आहे' पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोट

'मी जिवंत आहे' पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोट

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे कॅन्सरमुळे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झाले असल्याची माहिती तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याच समोर आलं आहे. पूनम पांडे हीने स्व:त सोशल मिडीयावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
Published by :
shweta walge

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे कॅन्सरमुळे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झाले असल्याची माहिती तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याच समोर आलं आहे. पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत तिचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं पूनमने व्हिडिओत म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये पूनम म्हणते, मी जिवंत आहे. माझा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झालेला नाही. पण, दुर्देवाने हजारो महिलांना सर्व्हायकल कॅन्सरने जीव गमवावा लागला आहे. कारण, त्यांना माहित नसतं की काय करायचं. पण, हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त तुम्हाला काही टेस्ट करून HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे महिलांना प्राण गमावू लागू नये म्हणून आपल्याला एकत्रित येऊन हे करायला हवं. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com