Urvashi RautelaLokshahi Team
मनोरंजन
उर्वशीने शेअर केली पोस्ट; चाहते झाले घायाळ
उर्वशीच्या व्हायरल पोस्टवर चाहत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया
आपल्या सौंदर्य रुपी अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी बॉलिवूडची (bollywood) नामांकित अभिनेत्री म्हणून उर्वशीची रौतेला(urvashi rautela) हिची ओळख आहे. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तिच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं तर ती आपल्या कामात नेहमी प्रामाणिक असते असं ती म्हणते. तिच्या कामाबद्दल असंख्य लोकांच्या प्रतिक्रियाही अगदी कौतुकास्पद असतात.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी उर्वशी ने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट एका डान्स शो दरम्यानची असल्याचं तिने सांगितलं. या फोटोमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. त्याच बरोबर तिने घातलेला शॉट मुळे तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
तिने सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर असंख्य चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत उर्वशी बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.