प्रार्थना बेहरेच्या भावाचं निधन, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली, 'अचानक निघून गेलास...'
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. आजवर तिने अनेक मालिका आणि सिनेमामध्ये उल्लेखनीय काम केलं आहे. मात्र काही तासांपूर्वीच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या भावाचं निधन झालं आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, लव्ह यू पिंटू…. तुझी कायम आठवण येते. तू असा अचानक निघून गेलास, आम्ही तुला निरोपही देऊ शकलो नाही. पण भाऊ कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, मौल्यवान आठवणी कधीच मरत नाहीत. शांततेत विश्रांती घे… पुढच्या आयुष्यात आपण एकमेकांना भेटू.
प्रार्थना सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ती सातत्याने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. प्रार्थना बेहरे शेवटची बाई गं या सिनेमात झळकली. या सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही.