Sikandar Movie : 'सिकंदर' चित्रपटाची Pre-Booking सुरु, ओलांडला लाखोंचा टप्पा, आकडेवारी ऐकून व्हाल थक्क

Sikandar Movie : 'सिकंदर' चित्रपटाची Pre-Booking सुरु, ओलांडला लाखोंचा टप्पा, आकडेवारी ऐकून व्हाल थक्क

सिकंदर चित्रपटाची प्री-बुकिंग सुरु, सलमान खानच्या चित्रपटाने 1.47 लाख तिकिटांचा टप्पा ओलांडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

एआर मुरुगदॉस दिग्दर्शित 'सिंकदर' चित्रपटाची चर्चा जोरदार होत आहे. या चित्रपटाच्या माध्यामांतून सलमान खान आणि रश्मिका मंदानी ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान आणि ईदचे समीकरण बॉक्स ऑफिसवर नेहमीच धुमाकूळ घालते. यावेळी सुद्धा सलमान खानचा 'सिंकदर' चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार यात काही शंका नाही. या चित्रपटाची प्री- बुकिंग मंगळवारपासून सुरु झाली असून या तीन दिवसांत 13,000 हून अधिक शोसाठी 1.47 लाखांहून अधिक तिकिटांची प्री- बुकिंग झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे अनेक सिंगल स्क्रीन शोचे आधीच हाऊसफुल झाले असल्याची माहिती मिळत आहे.

सलमान खानच्या 'ॲक्शन- ड्रामा- सिंकदर' हा चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हा ईदच्या दिवशी प्रदर्शित होतो. परंतू यंदाच्या वर्षी ईद सोमवारी आली. या कारणामुळे चित्रपट रविवारी प्रदर्शित होणार आहे. रमजानमध्ये उपवास करणारे लोक चित्रपटगृहांपासून दूर राहतात. त्यामुळे इच्छा असून काही मुस्लिम बांधव चित्रपटाच्या शोला जाऊ शकणार नाही. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या सिंगल स्क्रीन थिएटर आधीच हाऊसफुल आहेत.

काही दिवसांपूर्वी 'सिंकदर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. यावेळी सलमानने रश्मिकाच्या कामाचे कौतुक केले. रश्मिकासोबत काम करताना तरुणपणाचे दिवस आठवत असल्याचे सलमान खानने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com