Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनी इंदलकरचा नवा शो 'Almost Comedy' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
प्रियदर्शनी कोणत्यांना कोणत्या गोष्टीवरुन नेहमीत चर्चेत राहिली आहे. प्रियदर्शनीने आपल्या कामाची सुरुवात ETV मराठीवरील 'अफलातून लिटिल मास्टर्स' या लहान मुलांच्या कार्यक्रमापासून केली. यानंतर ती कामानिमित्त मुंबईला आली. हास्यजत्रेतील कलाकार वनिता खरात हिच्यासोबत मैत्री करत तिने पुन्हा मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'मौनांतर' या चित्रपटातून केली. त्यानंतर 'खामोशी' आणि 'पराना'मध्ये तिने काम केलं.
तसेच २०२१ मध्ये, तिने 'फोटोप्रेम' या मराठी चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नंतर, तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि फुलराणी,सोयरिक, आणि नवरदेव बीएससी या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शांती क्रांती आणि फर्जी यांसारख्या वेब सिरीजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. प्रियदर्शनीने डंबिगचे कामही केले आहे. तसेच ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हस्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये नियमित कलाकार बनली.
प्रियदर्शनी आपल्या चाहत्यांसाठी नवीकोरी मालिका घेऊन येणार असल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'almost comedy' या नावाचा स्टँडअप कॉमेडी शो ती घेऊन येणार आहे . मराठी मधला नवा स्टँडअप कॉमेडी शो येत्या २४ जानेवारी पासून एव्हरेस्ट मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहाता येणार आहे .
या कार्यक्रमात अक्षय जोशी, ऋषिकांत राऊत, चिन्मय कुलकर्णी, अमोल पाटील यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. प्रियदर्शनीचा चाहत्यावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिने कार्यक्रमाची बातमी दिल्यानंतर कार्यक्रमामध्ये काय गंमत आहे हे पाहणं औत्सुकतेच ठरणार आहे.