सीता मातेच्या भूमिकेसाठी कंगनाला कास्ट करण्याची निर्मात्यांची तयारी

सीता मातेच्या भूमिकेसाठी कंगनाला कास्ट करण्याची निर्मात्यांची तयारी

Published by :
Published on

अलौकिक देसाई यांच्या सीता या आगामी पौराणिक चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आधी सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा जोरावर होती . मात्र
करीना कपूरने या भूमिकेसाठी तिने १२ कोटीची मागणी केल्याची चर्चा झाल्याने लोक संतापले. करीनाच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर यामुळेच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवाय बरजंग दलानेही तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, असा धमकीवजा इशारा तिला दिला. मग काय करीना पुन्हा एकदा गाजागोजा गुंडाळून गप्प बसली. त्यानंतर आता निर्माते करिनाऐवजी चित्रपटात कंगना राणौतची वर्णी लागण्याची चिन्ह आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेन्द्र प्रसाद यांना कंगना या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी योग्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे सीता मातेच्या भूमिकेसाठी त्यांची ती पहिली पसंत आहे. तरीही चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, मेकर्सने कधीच या चित्रपटासाठी करिना कपूरशी संपर्क साधला नव्हता. मात्र तरीही चर्चा कुठून झाली हे मेकर्सला माहित नाही. मात्र या चर्चांना आलेल्या उधाणामुळे करिनाला सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अनेको लोकांच्या संतापला सामोरे जावे लागले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com