...तर दोन लाथा घातल्या असत्या; BMC कर्मचाऱ्याने जात विचारल्याने पुष्कर जोगची संतप्त पोस्ट

...तर दोन लाथा घातल्या असत्या; BMC कर्मचाऱ्याने जात विचारल्याने पुष्कर जोगची संतप्त पोस्ट

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी युध्द पातळीवर सर्व्हे सुरु आहे. अशात, या सर्व्हेवर मराठी सिनेसृष्टीतील काही तारकांनी आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडले आहे.

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी युध्द पातळीवर सर्व्हे सुरु आहे. अशात, या सर्व्हेवर मराठी सिनेसृष्टीतील काही तारकांनी आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडले आहे. दोन दिवसांपूर्वी केतकी चितळेने महापालिकेचे कर्मचारी घरी जातीय सर्वेक्षण करायला आल्याचं सांगितलं होतं. आता पुष्करने त्याला नुकताच आलेला अनुभव इन्स्टाग्रामवर सांगत एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

पुष्कर जोग म्हंटले की, काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे. पुष्करची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, पुष्कर जोग बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचला. आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच पुष्कर जोग मुसाफिरा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com