Parineeti Chopra | Raghav Chadha
Parineeti Chopra | Raghav ChadhaTeam Lokshahi

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लवकरच अडकणार विवाहबंधनात; ही असणार लग्नाची तारीख?

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
Published by :
Sagar Pradhan
Published on

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा रिलेशनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच मे महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर हे दोघ विवाहबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली होती. त्यातच आता चाहत्यांसाठी एक आंनदाची समोर आलीय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.

Parineeti Chopra | Raghav Chadha
स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम बंद पाडण्याचा बजरंग दलाचा डाव

आता नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थानमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर लग्नाची तयारी देखील जोरदार सुरू आहे. एका रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 25 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या विवाहाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com