'...तर अक्षय कुमारला अटक होऊन देशाच्या बाहेर काढले जाईल'

'...तर अक्षय कुमारला अटक होऊन देशाच्या बाहेर काढले जाईल'

Ramsetu चित्रपट वादच्या भोवऱ्यात; Subramanian Swamy यांनी केली तक्रार दाखल
Published by :
Team Lokshahi

नवी दिल्ली : अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास प्रभाव पाडताना दिसले नाही. आगामी चित्रपट रामसेतू (Ramsetu) याकडून आता अक्षय कुमारच्या आशा टिकून आहेत. परंतु, हा चित्रपट रिलीझ होण्याआधीच वादात सापडला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी या चित्रपटावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. व याप्रकरणी अक्षयाला अटक होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरुन अक्षय कुमारवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मी अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या 'राम सेतू' चित्रपटात चुकीचे तथ्य मांडले आहे. या चित्रपटामुळे राम सेतूची प्रतिमा खराब झाली आहे. माझे वकील सत्य सभरवाल हे संपूर्ण प्रकरण पाहत आहेत.

आणखी एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेता अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून देशातून हाकलण्यास सांगू शकतो, असे सांगितले आहे.

अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'राम सेतू' मध्ये अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडीज, नुसरत भरुचा आणि सत्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि राम सेतू वास्तव आहे की मिथक हे शोधण्यासाठी एका पुरातत्वशास्त्रज्ञाचे तो अनुसरण करताना दाखवला आहे. रामसेतू चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टरही रिलीझ झाले होते. या पोस्टरमध्ये अक्षयच्या हातात मशाल होती. तर, त्याचवेळी त्याच्याजवळ उभ्या असलेल्या जॅकलिनच्या हातात टॉर्च होती. मशाल आणि टॉर्चचा तर्क लोकांना समजला नाही. यामुळे कलाकारांना खूप ट्रोल करण्यात आले. रामसेतू चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com