बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt Ranbir Kapoor)आज म्हणजेच १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. पंजाबी रितीनुसार होणाऱ्या या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच, त्यांच्या लग्नाची गुप्तता ठेवण्यासाठी, दोन्ही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
रणबीर कपूरची आई नीतू आणि बहीण रिद्धिमा कपूरही लग्नासाठी रवाना झाल्या आहेत. यावेळी लेहेंगा परिधान केलेल्या नीतू आणि रिद्धिमाने पापाराझींसाठी पोज दिले.
आलियाची आई आणि बहीण लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या
रणबीर आणि आलियाच्या लग्नाला थोडाच वेळ आहे. अशा परिस्थितीत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाहुणे येत आहे. याच क्रमात अभिनेत्री आलियाची आई, सोनी राजदान आणि तिची बहीण शाहीन राजदान यांचे फोटो समोर आले आहेत.
महेश भट्ट आणि पूजा भट्टही लग्नाच्या ठिकाणी पोहोचले
आलिया भट्टच्या लग्नात वडील महेश भट्टही पोहोचले आहेत. यावेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट त्यांची मुलगी पूजा भट्टसोबत कॅमेऱ्यात कैद झाले.
करीना रणबीरच्या घरी पोहोचली
करीना कपूर पती सैफ अली खानसोबत लग्नाच्या ठिकाणी पोहोचली आहे.
करिश्मा कपूरचा सहभाग
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरही तिचा भाऊ रणबीर कपूरच्या लग्नात सहभागी होण्यासाठी लग्नस्थळी पोहोचली आहे. कॅमिओमध्ये कैद झालेली अभिनेत्री यावेळी खूपच सुंदर दिसत होती.