‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या पर्वात ‘ती’ परत येतेय…

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या पर्वात ‘ती’ परत येतेय…

Published by :
Published on

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहे.

नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून झालेली सुरु झालेली कथा वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी एक अशी व्यक्ती हवी आहे जी ह्या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. ही व्यक्ती आहे वच्छी.. होय 'वच्छी परत येतेय'. वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार? खरच माईच्या पाठीशी उभी राहणार का? शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? तुमच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन 'वच्छी परत येतेय.'वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मालिकेत बघायला मिळणार आहे.. त्यामुळे वच्छी आता काय करामती करणार याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com