‘रात्रीस खेळ चाले पर्व 3’ ही मालिका अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

‘रात्रीस खेळ चाले पर्व 3’ ही मालिका अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Published by :
Published on

अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी 'रात्रीस खेळ चाले पर्व 3' ही मालिका अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. झी मराठी वरच्या या मालिकेची दोन्ही पर्व विशेष गाजली. आणि आता तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली.

सुरुवातीला सुंदर असा नाईकांचा कोकणातील वाडा दाखवण्यात आला. तर एक व्यावसायिक मंबईहून कोकणात हा वाडा विकत घेण्यासाठी आलेला असतो, वाडा पाहून त्याचही मन भारावून जातं. प्रत्यक्षात अण्णा नाईक त्याच स्वागत करतात पण अण्णा सोडून वाड्यात कोणीही नसतं. अण्णा त्या व्यावसायिकाच आदरातिथ्य करतात. पण दारू उतरल्यानंतर त्या व्यावसायिकाला तेथे भयानक दृश्यं दिसू लागतात तर तिथे काहीही नसून तो वाडा बेचिराख अवस्थेत पडलेला असतो. आणि त्यानंतर तो माणूस तिथून निघन जातो.

सीरिअलच्या पहिल्या भाग नंतर अण्णा नाईकांचे डायलॉगचे मिम्स देखील सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत. अपूर्वाने तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर शेवंताचा नवा लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे. तेव्हा आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com