'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा आज होणार शेवट

'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा आज होणार शेवट

Published by :
Published on

झी मराठी (zee marathi) वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्या मालिकांकडे वेधून घेतले आहे. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

झी मराठी वाहिनीवर अनेक मालिका सध्या सुरू आहेत. रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका अखेरच्या टप्प्यात आली असून आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप आधींच्या भागामध्ये भोगावे लागले आणि अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अत्रुप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको या सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. आज शेवटच्या भागात नाईक कुटुंब आनंदाने पुन्हा एकत्र राहताना आपल्याला दिसणार आहे.

'रात्रीस खेळा चाले 3' आणि त्यासोबतच 'घेतला वसा टाकू नको' हा कार्यक्रमदेखील आज संपणार असून त्याचाही आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. 'घेतला वसा टाकू नको'च्या जागी आदेश बांदेकरांचा महामिनिस्टर कार्यक्रम 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com