‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंताने दिला गोरगरीबांना मदतीचा हात

‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंताने दिला गोरगरीबांना मदतीचा हात

Published by :
Published on

रात्रीस खेळ चाले मालिकेतून शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साताऱ्यात आपल्या नव्या बिझनेसची सुरूवात काही दिवसांपूर्वी केली होती. तिने अपूर्वा कलेक्शन नावाने साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यात तिला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो अशी चांगली भावना ठेवत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

यातून तिने गोरगरीबांसाठी केलेली मदत पाहून तिचे चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत. सातारा परिसरातील अत्यंत गरीब वयस्कर भीक मागणाऱ्या लोकांची दिवाळी तिने गोड केलेली पाहायला मिळते.

काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली की, समाजातील गरीब आणि दुर्लक्षित भीक मागणाऱ्या वयस्कर, अनाथ अशा लोकांचे पालनपोषण करणे, त्यांना,शासनाकडून जेवण, कपडे, निवास या सुविधा देऊन, त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे, वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य सरकारकडून भिक्षेकरी गृह मार्फत केले जाते. त्यामुळे मी अपूर्वा कलेक्शन्स या उपक्रमाची सातारामध्ये नव्याने सुरुवात केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com