शेवंता परत येतीये; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेचे पुनरागमन

शेवंता परत येतीये; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेचे पुनरागमन

Published by :
Published on

झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, 'रात्रीस खेळ चाले' आणि 'रात्रीस खेळ चाले २ ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता या पात्रांना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण लॉकडाउनमुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता लवकरच पुन्हा एकदा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मालिकेत आता शेवंताचे पुनरागमन पाहायला मिळणार आहे.

लवकरच 'रात्रीस खेळ चाले ३'चे चित्रीकरण पुन्हा सुरु केले जाणार आहे. या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार असल्याची माहिती मिळतेय.

१६ ऑगस्ट पासून रात्री ११ वाजता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि त्यात सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी शेवंता प्रेक्षकांना दिसली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com