रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; प्रकरण थेट पोलिसांत!

रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; प्रकरण थेट पोलिसांत!

अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रवीना टंडनला धक्काबुक्की करताना दिसत आहे.
Published by :
shweta walge

अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रवीना टंडनला धक्काबुक्की करताना दिसत आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे भागातील आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये रवीनाला पीडितेचे कुटुंब आणि स्थानिक जमावाने घेरले आहे. पोलिसांना बोलवा असे लोक बोलत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये, काही लोक रवीना सोबत कसे वाद घालत आहेत, धक्काबुक्की करत आहेत आणि रवीना (रवीना टंडन) च्या ड्रायव्हरने एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला मारल्याचा आरोप केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रवीना मध्यस्थी करताना दिसत आहे. पाठीमागे एका महिलेचा नाकाला दुखापत झाल्याचा आवाज ऐकू येतो. काही लोक रवीनाच्या ड्रायव्हरला मारल्याबद्दल म्हटलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com