Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं 78व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं 78 व्या वर्षी निधन झालं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे.ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता.
हमाल दे धमाल, थरथराट, चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. रविंद्र बेर्डे यांनी 300हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखिल त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रविंद्र बेर्डे हे सख्खे भाऊ आहेत. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.