Rohit Arya Case : 'त्या' वेबसीरिजचं शुटिंग सांगून रोहित आर्यने केला होता अभिनेत्रीला संपर्क; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Rohit Arya Case : 'त्या' वेबसीरिजचं शुटिंग सांगून रोहित आर्यने केला होता अभिनेत्रीला संपर्क; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रोहित आर्यने अभिनेत्री रुचिता जाधवशी संपर्क केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्या या व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच त्याचे चकमकी दरम्यान एन्काऊंटर करण्यात आले.

यादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रोहित आर्यने अभिनेत्री रुचिता जाधवशी संपर्क केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत त्याने अभिनेत्री रुचिता जाधवसोबत संपर्क केला होता. 'लेट्स चेंज 4' या वेबसीरिजचं आर्य शुटिंग करणार होता असं त्याने रुचिताला सांगितलं होत. तसेच यावेळी त्याने अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कानेटकरने स्टुडिओत भेट दिल्याची माहिती अभिनेत्री रुचिता जाधवला दिली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com