Ruturaj Gaikwad Wedding
Ruturaj Gaikwad WeddingTeam Lokshahi

Ruturaj Gaikwad Wedding: CSKचा फलंदाज ऋतुराज गायकवाड 'या' महिला क्रिकेटपटूसोबत अडकला लग्नबंधनात

Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे.
Published by :
shweta walge
Published on

भारताचा युवा क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार प्लेअर मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड कालच विवाह बंधनात अडकला. काल त्याने उत्कर्षा पवारशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आयपीएल IPL 2023 च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षा पवारसोबत फिरताना दिसले होते दिसला. त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती.

ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे आणि आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या रुपात झाले आहे. दोघाचं लग्न जवळची मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले. या फोटोंवर ऋतुराजच्या चाहत्यांनी, याचबरोबर त्यांच्या मित्रमंडळींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.

Ruturaj Gaikwad Wedding
Who is Jigna Vora? जाणून घ्या कोण आहे जिग्ना व्होरा, जीच्यावर नेटफ्लिक्सची 'स्कूप' वेब सीरिज

गेले अनेक महिने सायली संजीवचं नाव ऋतुराज गायकवाडशी जोडलं जात होतं. ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण सायलीने अनेकदा यावर भाष्य करत त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com