मनोरंजन
Sagar Karande Cheated : फसवणूक झालेला 'तो' मी नव्हेच, सागर कारंडेचं स्पष्टीकरण
सागर कारंडे फसवणूक: ६१ लाखांची फसवणूक प्रकरणात सागर कारंडेचं स्पष्टीकरण.
अभिनेता सागर कारंडे यांची ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी मुंबई सायबर क्राईम मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पिंपळगाव बसवंत येथे एका कार्यक्रमानिमित्त सागर कारंडे आले असता त्यांना विचारले मात्र सुरुवातीला याप्रकरणी बोलणे टाळाटाळ केली यानंतर माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता, हे प्रकरण एक असून सागर कारंडे नावाचा मी एकटाच नव्हे गुगलवर तुम्ही सर्च केले तर खूप दिसतील. असे म्हणत माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना गोलमाल उत्तर दिले.
या प्रकरणी सागर कारंडे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, सागर कारंडे नावाचा मी एकटाच नव्हे, गुगलवर तुम्ही सर्च केले तर या नावाचे खूप दिसतील. असे म्हणत ऑनलाईन फसवणूक झालेला सागर कारंडे आपण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.