Sai Tamhankar: 'मिमी'च्या यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा एकदा दिसणार हिंदी चित्रपटात, ट्रेलर रिलीज

Sai Tamhankar: 'मिमी'च्या यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा एकदा दिसणार हिंदी चित्रपटात, ट्रेलर रिलीज

सईने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. 'मिमी' या हिंदी चित्रपटात देखील सईने उत्कृष्ट भूमिका साकारली होती. नुकताच सई ताम्हणकरच्या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
Published by :
Team Lokshahi

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सईने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'मिमी' या हिंदी चित्रपटात देखील सईने उत्कृष्ट भूमिका साकारली होती. यानंतर सई काही सिनेमांमध्ये, वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली होती. नुकताच सई ताम्हणकरच्या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. या चित्रपटाचे नाव 'भक्षक' असे आहे.

या चित्रपटामध्ये भूमी पेडणेकरसोबत सई ताम्हणकरदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटांत भूमी पेडणेकर वैशाली सिंह या पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळेल. या टीझरमध्ये जरी सईची एकच झलक पाहायला मिळत असली तरीदेखील तिच्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

'भक्षक' या चित्रपटाची गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. या टीझरमध्ये एका पुलावरून लाल रंगाची कारमध्ये भूमी पेडणेकर जात आहे. नंतर शेल्टर होमचा दरवाचा उघडतो, आणि मुनव्वरपुरच्या चाइल्ड शेल्टर होममध्ये मुलींवर लैगिंक अत्याचार होत असल्याची बातमी ऐकायला मिळते. यानंतर राजकारण्यांसोबतचं असलेलं कनेक्शन पाहायला मिळते. सई ताम्हणकर आपल्याला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटांत भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर, संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुलकितने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी केली आहे. लवकरच हा चित्रपट १९ फेब्रुवारीमध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com