Salman Khan: हिंदी सिनेसृष्टीत भाईजानला 35 वर्ष पूर्ण

Salman Khan: हिंदी सिनेसृष्टीत भाईजानला 35 वर्ष पूर्ण

सलमान खानने बॉलिवूडमध्ये 35 वर्षे पूर्ण केली, सोशल मीडियावर चाहत्यांचे खास आभार!
Published by  :
Team Lokshahi

अभिनय विश्वातील 35 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानने 26 ऑगस्ट रोजी चित्रपटसृष्टीत 35 वर्षे पूर्ण केली आहेत. या अभिनेत्याने 1988 मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मैने प्यार किया, बागी, ​​सनम बेवफा, पत्थर के फूल, साजन यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूडला एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. यासोबतच हा सलमानने देखील हा क्षण चाहत्यांसोबत साजरा केला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. यात त्याने त्याच्या काही सुपरहिट चित्रपटांचे सीन शेयर केले आहेत.

या व्हिडिओत सलमानच्या मैने प्यार किया, हम दिल दे चुके सनम, वॉन्टेड, टायगर जिंदा है, रेस 3, बॉडीगार्ड, दबंग, सुलतान, भारत यासारख्या सुपरहिट चित्रपटांमधील काही संवाद आणि सीन्स आहेत.. रील शेअर करताना सलमानने लिहिले की, ' 35 वर्षे हे 35 दिवसांरखे गेले. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'

अभिनय विश्वातील ३५ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सलमान खानने त्याच्या चित्रपटातील काही दृश्यांचा कोलाज व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या चित्रपटातील काही प्रसिद्ध संवाद आणि गाण्याच्या स्टेप्स आहेत. व्हिडिओ शेअर करताना सलमानने लिहिले- '35 वर्षे 35 दिवसांसारखी झाली, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.'

सलमान खानच्या या व्हिडिओवर चाहते खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका व्यक्तीने कमेंट केली- 'येथे दुसरा सलमान खान कधीच असू शकत नाही.' आणखी एका चाहत्याने लिहिले- 'मी म्हातारा झालो तरी सलमान खान नेहमीच माझा आवडता राहील.' याशिवाय एका यूजरने लिहिले- 'बॉलिवुड इंडस्ट्रीत 35 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.'

सलमान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. तर टायगर 3 या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी रिलिज होईल. शाहरुख खान टायगर 3 मध्ये कॅमिओ करेल तर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com