'टायगर 3'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सलमानवर भारी पडला कतरिनाचा अ‍ॅक्शनपॅक अवतार

'टायगर 3'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सलमानवर भारी पडला कतरिनाचा अ‍ॅक्शनपॅक अवतार

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अ‍ॅक्शन, ड्रामा, थ्रिल आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या टायगर 3सोबत चाहत्यांसाठी सज्ज झाला आहे.

टायगर 3 च्या ट्रेलरमध्ये सलमान खानचा अ‍ॅक्शन अवतार पाहून चाहते प्रभावित झाले आहेत. यावेळी अविनाश सिंग राठौर आणि झोया यांच्या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमधून इम्रानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानची तुफानी अ‍ॅक्शन आणि कतरिनाचे अ‍ॅक्शन सीन्स प्रभावी आहेत. यावेळी टायगरचे देश आणि कुटुंब धोक्यात आल्याचे दिसते आहे. दोन्हीपैकी तो कोणाला वाचवणार याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.

यशराज फिल्म्सच्या सुपरहिट फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. टायगर 3 या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यशराज फिल्म्सचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रकल्प असल्याचे बोलले जात आहे.

रेवती, रिद्धी डोगरा, रणवीर शौरी, कुमुद मिश्रा, विशाल जेठवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत. निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईजही ठेवले आहे. सलमानच्या या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ दिसणार आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचा हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com