Bigg Boss 17: बिग बॉस चाहत्यासाठी मोठा झटका!

Bigg Boss 17: बिग बॉस चाहत्यासाठी मोठा झटका!

रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 17 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान हा बिग बॉसला होस्ट करताना दिसतो.
Published by :
shweta walge
Published on

रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 17 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान हा बिग बॉसला होस्ट करताना दिसतो. पण बिग बॉस चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. कारण बिग बाॅस 17 मध्ये सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार नाहीये.

बिग बाॅस 17 मध्ये सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार नाहीये. चित्रपटांचे बिझी शेड्युल असल्याने सलमान खान मुंबईमध्ये नसणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉस 17ला जरी सलमान खान विकेंडच्या वारला होस्ट करताना दिसणार नसला तरीही फिनालेला सलमान खान हा धमाका करणार आहे.

सलमान खान हा बिग बाॅस 17 होस्ट करणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळत आहे.बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांनी यावर अजूनही काही खुलासा केला नाहीये. महेश मांजरेकर किंवा करण जोहर हा बिग बाॅस 17 ला होस्ट करू शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com