सलमान खानच्या अडचणी वाढल्या, आता या प्रकरणात कोर्टाचे समन्स
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानला (Salman Khan) नुकताच काळवीट शिकार (Blackbuck Poaching Case) प्रकरणामधून मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले होते. मात्र आता या अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
एएनआय (ANI) न्युज एजन्सीनुसार, अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने (Andheri Metropolitan Court) मंगळवारी एका पत्रकाराने दाखल केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्ड (Bodyguard) विरुद्ध समन्स जारी केले आहे. तक्रारदार अशोक श्यामल पांडे (Ashok Shyamal Pandey) यांनी सलमान खान आणि त्यांच्या बॉडीगार्ड विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३९२, ४२६, ५०६ (II) आर/डब्ल्यू ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार तक्रारदाराने आरोपी विरुध्द सीआरपीसी धारा 156(3) च्या अंतरर्गत निर्देश जारी करण्याची विनंती केली आहे. हि घटना 4 सप्टेंबर 2019 मध्ये तक्रारदार आणि प्रस्तावित आरोपी व्यक्तीमध्ये वाद झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्यांची नोंद केली आहे.