Sanjay Dutt: संजय दत्तकडून स्वतःलाच वाढदिवसानिमित्त ही खास भेट, किंमत जाणून व्हाल थक्क!
बॉलिवूडचा संजूबाबा अशी ओळख निर्माण करणारा संजय दत्त हा त्याच्या पर्सनालिटीसाठी ओळखला जातो. संजय दत्तचा जवान नंतर आता डबल स्मार्ट शंकर या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात राम पोथीनेनी हा दक्षिणात्य कलाकार संजय दत्तसह दिसणार आहे.
संजय दत्तचा नुकताच 29 जुलैला वाढदिवस येऊन गेला. वाढदिवसानिमित्त संजय दत्तला त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. संजय दत्तने वाढदिवसाचे स्वतःच स्वतःसाठी आलिशान गिफ्ट घेतले आहे. या त्याच्या गिफ्टची किंमतही तितकीच जास्त आहे. या त्याच्या गिफ्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. हे आलिशान गिफ्ट म्हणजे कार आहे. संजय दत्तने वाढदिवसानिमित्त रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. या कारची किमंत 4 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. संजय दत्तने घेतलेली ही कार आयकॉनिक आणि काळ्या रंगामध्ये आहे. तर यावर्षीचा संजय दत्तचा वाढदिवस हा जोरदार आणि शुभेच्छांच्या वर्षावासह साजरा झालेला आहे.