सांजवातच्या ऑडिशनला अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी दिली विशेष भेट

सांजवातच्या ऑडिशनला अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी दिली विशेष भेट

ओम शिवम फिल्म्स अँड प्रोडक्शन मयूर खेतले निर्मित सांजवत चित्रपटाचे ऑडिशन उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले
Published on

निसार शेख | शिरगाव : ओम शिवम फिल्म्स अँड प्रोडक्शन मयूर खेतले निर्मित सांजवत चित्रपटाचे ऑडिशन उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी जिल्ह्यातील अनेक कलाकार यांनी आपली कला सादर केली. तर अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी विशेष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तर चिपळूणच्या राजकारणावर चित्रपट काढावा, अशी इच्छा माजी नगराध्यक्ष सुरेखा खराडे यांनी व्यक्त केली.

सांजवातच्या ऑडिशनला अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी दिली विशेष भेट
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील 'बिल्ली बिल्ली' गाण्याचा टिझर प्रदर्शित

यावेळी निर्माता मयूर खेतले, प्रोडक्शन व्यवस्थापक दीपक शिंदे, लेखक निसार शेख आणि श्रीराम पवार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निर्माता मयुर खेतले यांनी प्रास्तविक मधून ओम शिवम फिल्म्स अँड प्रोडक्शन हाऊस ची निर्मिती करण्याचा उद्देश सांगितला. तसेच सांजवात चित्रपटाची निर्मित कशी झाली याबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांनी निर्माता मयूर खेतले यांना शुभेच्छा देत हा चित्रपट नक्कीच पारितोषिक मिळविले, अशी शुभकामना दिली.

माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी नटश्रेष्ठ डॉ काशिनाथ घाणेकर सारखे कलाकार कोकणच्या मातीत घडावे. त्याचबरोबर निर्माता म्हणून मयूर खेतले पाऊल टाकत आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. पण, चित्रपटाचे लेखक निसार शेख यांनी आतापर्यंत दोन फिल्म केल्या असून त्यांना चिपळूणच्या राजकारणाचा भौगोलिकृष्ट्या अभ्यास आहे. त्यामुळे निसार शेख यांनी चिपळूणच्या राजकारणावर चित्रपट काढावा. आपण त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com