साराने अखेर सांगितले शुभमन गिल कोणाला करतोय डेट?

साराने अखेर सांगितले शुभमन गिल कोणाला करतोय डेट?

सध्या करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन 8 या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

सध्या करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन 8 या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर आणि दीपिका यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये आता सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी हजेरी लावणार आहेत. या प्रोमोमध्ये सारा ही शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगबाबत बोलताना दिसत आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, करण जोहर हा सारा अली खानला तिच्या आणि शुभमन गिल यांच्या डेटिंगच्या चर्चेबाबत विचारतो. त्याबद्दल बोलताना सारा म्हणते, 'सगळं जग चुकीच्या साराच्या मागे लागलं आहे.' सारानं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत आहेत, असं कॉफी विथ करणमध्ये सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये शुभमन गिलला 'तू साराला डेट करतोय का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला होता, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' पण तेव्हा शुभमन नेमकं कोणत्या साराबद्दल बोलत होता, हे प्रेक्षकांना कळाले नव्हते. पण आता कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सारा अली खाननं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगबाबत सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com