वृक्षवल्ली अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

वृक्षवल्ली अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

Published by :

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाअंतर्गत दुर्मिळ प्रजातींचे वृक्ष आणि वेलींचं संगोपन आणि संवर्धन कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. सयाजी शिंदे यांनी यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठं काम हाती घेतली आहे.

या उपक्रमामध्ये बोरीवलीतील नॅशनल पार्क इथं कृष्णवड, तेंदु, अजानवृक्ष, हुंब यासारख्या 22 दुर्मिळ देशी प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसंच हिरडा, बेहेडा, मुचकुंद अशा अनेक औषधी वनस्पती आणि वेलींयुक्त बोटोनिकल गार्डन, शाश्वत आठवणींचा वारसा जपण्याच्या हेतूने उभारण्यात येणारी वृक्षरुपी ऑक्सिजन बँक यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे. सयाजी शिंदे यांनी आता पर्यंत 22 देवराई , 1 वृक्ष बँक , 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com