शाहरुखची लेक सुहाना खान करणार शेती? आलिबागमध्ये खरेदी केली एवढ्या किंमतीची जमीन

शाहरुखची लेक सुहाना खान करणार शेती? आलिबागमध्ये खरेदी केली एवढ्या किंमतीची जमीन

शाहरुखची लेक सुहाना खानने अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता शेती करण्याची आवड निर्माण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शाहरुखची लेक सुहाना खानने अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता शेती करण्याची आवड निर्माण झाली आहे. या गोष्टीमुळे ती आता चर्चेत आली आहे. लवकरच ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे. सुहाना खानने या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहानाने शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी शाहरुखने आलिबानमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे

सुहानाने आलिबागमधील थाल गावातील जमीन तिने शेती करण्यासाठी विकत घेतली आहे. कोट्यवधी रुपयांमध्ये तिने ही जमीन विकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दीड एकर जागेत 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. सुहाना खानने 1 जून 2023 रोजी दीड एकर जमीन विकत घेतली आहे. जमिनीचा व्यवहार आणि नोंदणीदेखील 1 जून रोजीच झाली होती. या जागेची एकूण किंमत 12.91 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com