‘देशावर संकट येताच न्यूयॉर्कला पळून चालले’, म्हणतं शाहरुख खानच्या कुटुंबाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

‘देशावर संकट येताच न्यूयॉर्कला पळून चालले’, म्हणतं शाहरुख खानच्या कुटुंबाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Published by :
Published on

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सहकुटुंब रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसले गेले. यावेळी हे दोघेही न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्यांना कोरोनाची आठवण करून देत आहेत. तर काही लोक या कठीण काळात देश सोडून चालल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत.

वास्तविक, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हल्ली न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहत आहे. कोरोना काळात, भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान हे तिला भेटण्यासाठी निघाले आहेत. अशा स्थितीत लोकांचा रोष या दोघांवर उमटला आहे. एका व्यक्तीने लिहिले की, 'हे सेलिब्रेटी फक्त नावाचे भारतीय आहेत, जेव्हा जेव्हा देशावर एखादी समस्या येते तेव्हा ते देशापासून दूर पळून जातात.'

त्याचबरोबर बरेच सामान्य लोक आणि चाहते प्रश्नांचा भडीमार करत विचारत आहेत की, 'लॉकडाऊन फक्त सामान्य लोकांसाठी आहे का?, ही माणसे कशी जगभर फिरत आहेत'. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, 'कोणीतरी मालदीवला जात आहे, कोणी न्यूयॉर्कला जात आहे'. त्याचवेळी एकाने लिहिले, 'त्यांना भारताबाहेरच काढा.'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com