शाहरुख कोणाला म्हणाला छोटा जवान? सोशल मीडियावर होतोयं व्हायरल

शाहरुख कोणाला म्हणाला छोटा जवान? सोशल मीडियावर होतोयं व्हायरल

बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जवानची क्रेझ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांवरच आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जवानची क्रेझ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांवरच आहे. चाहते ट्विटरवर चित्रपटाचे कौतुक करत शाहरुख खानला टॅग करत आहेत. अशातच, शाहरुख खानने छोटा जवान म्हणत ट्विट केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

शाहरुख खान सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतो. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरांशिवाय त्यांच्या पोस्टही रिट्विट करत असतो. अशाच, एका शाहरुखच्या चाहत्याने छोट्या मुलाचा व्हिडीओ त्याला टॅग केला आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलगा जवानच्या पोस्टरसमोर उभा राहून शाहरुखचा डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून शेअर केले जात आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत शाहरुख खानने धन्यवाद, माय लिटील जवान, असे म्हंटले आहे. सोबतच, हार्टचा इमोजी शेअर केला आहे.

दरम्यान, शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'जवान'ने पहिल्या दिवशी 125.05 कोटी आणि चौथ्या दिवशी 156.80 कोटींची कमाई केली. आतापर्यंत 'जवान'ने जगभरात 531.26 कोटी रुपये कमवले आहेत. यासह जवान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक वीकेंड कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com